ग्वालियर- मध्य प्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. निवडणूक लक्षात घेता मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी जनतेचा आशीर्वाद मिळविण्यासाठी जनआशीर्वाद यात्रा काढली आहे. दरम्यान उच्च न्यायालयाने या यात्रेवर झालेल्या खर्चाची माहिती मागितली आहे. याचिकाकर्ता अॅड.उमेश बौहरे यांनी कोर्टात भाजपने प्रचार यात्रेसाठी प्रत्येक जिल्ह्यात २ कोटींच खर्च केला आहे अशी माहिती दिली. दरम्यान शासनातर्फे अशी कोणतीही रक्कम खर्च झालेली नसल्याचे सांगितले आहे.