कोलकाताचा रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुवर विजय

0
कोलकाता :- कोलकाता नाइट रायडर्सने सुनिल नरेन (५०) आणि कर्णधार दिनेश कार्तिक (३५*) यांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुवर विजय मिळविला. कोलकाताने १८.५ षटकात ६ फलंदाजांच्या मोबदल्यात सामना जिंकला.
इडन गार्डनवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बंगळुरू टीमने २० षटकांत ७ बाद १७६ धावा काढल्या. या धावसंख्येत ब्रेंडन मॅक्क्युलमने २७ चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकारांसह ४३ धावा आणि एबी डी’व्हिलियर्स (४४) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. डी’व्हिलियर्सने एक चौकार आणि पाच षटकारांसह फक्त २३ चेंडूंत आपली खेळी साकारली. याशिवाय मनदीप सिंगने १८ चेंडूंत ३७ धावा काढल्या. तर कर्णधार विराट कोहली ३१  यांनीसुद्धा योगदान दिले. कोलकत्ता नाइट रायडर्सतर्फे सलामीवीर सुनिल नरेन  ४ चौकार आणि ५ षटकारांसह १९ चेंडूंत ५० धावा काढीत आक्रमक सुरुवात करुन दिली. उमेश यादवने नरिनचा त्रिफळा उडवल्यानंतर नितीश राणा (३४) आणि दिनेश कार्तिक (नाबाद ३५) यांनी चौथ्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी रचली.
धावसंख्या
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु : २० षटकांत ७ बाद १७६ (ब्रेंडन मॅक्क्युलम ४३, एबी डी’व्हिलियर्स ४४; नितीश राणा २/११) पराभूत वि. कोलकाता कोलकाता नाइट रायडर्स : १८.५ षटकांत ६ बाद १७७ (सुनील नरिन ५०, नितीश राणा ३४, दिनेश कार्तिक नाबाद ३५; ख्रिस वोक्स ३/३६)