कोलकात्याचा ‘गंभीर’ विजय!

0

राजकोट । आयपीएलच्या दहाव्या चरणात कोलकात्याचा संघ तुफान फार्मात असून त्यांचा रथ सुसाट आहे. याला कारण कर्णधार गौतम गंभीर आणि रॉबीन उथप्पा ही जोडी. या जोडीच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर केकेआरने आपला सातवा विजय संपादित केला आहे. 161 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या केकेआरने दिल्लीवर सात विकेटने विजय मिळवला. दिल्लीने दिलेले 161 धावांचे आव्हान केकेआरने 22 चेंडू राखून पार केले. या विजयाचा शिल्पकार अर्थातच कर्णधार गौतम गंभीर आणि उथप्पा ठरला. गंभीरने 52 चेंडूत नाबाद 71 धावांची खेळी केली, तर रॉबीन उथप्पाने 33 चेंडूत 59 धावा ठोकल्या. दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी रचली. कोलकाताने तीन षटके शिल्लक ठेवून दिल्लीचे 161 धावांचे आव्हान गाठले आणि सात विकेट्सने विजय साजरा केला.

ऑरेंज कॅप गंभीरकडे
हाणामारीच्या षटकात दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यामुळे दिल्लीची धावसंख्या मर्यादित राहिली. कोलकात्याकडून कुल्टर नाइलने 3 बळी मिळवले. गौतम गंभीर आणि रॉबीन उथप्पा या जबरदस्त फॉर्मात असणार्‍या जोडीने आज पुन्हा एकदा आपल्या नजाकती फलंदाजीचा नजराणा पेश करत दिल्लीचे 161 धावांचे आव्हान फोडून काढले. कर्णधार गौतम गंभीर कोलकात्याच्या विजयाचा शिल्पकार ठरला. गंभीरने 52 चेंडूत नाबाद 71 धावांची खेळी साकारली, तर रॉबीन उथप्पाने 33 चेंडूत 59 धावा ठोकल्या. दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी रचली. कोलकाताने दोन षटके शिल्लक ठेवून दिल्लीचे 161 धावांचे आव्हान गाठले आणि सात विकेट्सने विजय साजरा केला. गौतम गंभीरने या खेळीसह सर्वोत्कृष्ट फलंदाजाची ऑरेंज कॅप देखील पटकावली आहे. या विजयासह कोलकाता गुणतालिकेत निर्विवाद आघाडीवर पोहोचला आहे.

संजू सॅमसनचा धडाका
संजू सॅमसन आणि श्रेयस अय्यर यांच्या फलंदाजीच्या बळावर दिल्लीने 20 षटकात सहा बाद 160 धावा केल्या. संजू सॅमसनने 38 चेंडूत तीन षटकार आणि सहा चौकाराच्चा मदतीने 60 धावा केल्या. करुण नायर आणि संजूने पहिल्या विकेट साठी 4.5 षटकात 48 धावांची सलामी दिली. करुण नायर बाद झाल्यनंतर श्रेअस अय्यरने संजू सॅमसनला सुरेख साथ देताना धावगती वाढवली. श्रेयस अय्यरने 34 चेंडूत 47 धावांची खेळी केली, या खेळीदरम्यान त्याने 1 षटकार आणि चार चौकार लगावले. दमदार सुरूवातीनंतर मधली फळी अपयशी ठरल्याने दिल्लीला मोठी खेळी करण्यात अपयश आले. रिषभ पंत, अँडरसन, मॉरीस हे पुन्हा एकदा अपयशी ठरले. शेवटच्या पाच षटकात दिल्लीकरांना फक्त 30 धावा करता आल्या.