पुणे । चौदा वर्षांखालील मुलांच्या गटाच्या अंतिम लढतीमध्ये मुंबई संघाने कोल्हापूर संघाला 1-0 पराभूत करताना महाराष्ट्र राज्य आंतरशालेय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली. पुणे संघाने औरंगाबाद संघाला 4-0 असे पराभूत करताना तिसरे स्थान राखले.
मुलांच्या अंतिम लढतीत. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. मध्यंतरानंतर मुंबई संघाच्या स्वान वनाप्पाने 48 व्या मिनिटाला गोल करताना मुंबई संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. याच गोलने मुंबई संघाला विजय मिळवून दिला. तिसर्या स्थानासाठी झालेल्या लढतीत पुणे संघाने औरंगाबाद संघाला 4-0 असे पराभूत केले. पुण्याच्या फैझल शेखने 2 र्या तर, करण मडकेने 7 व्या मिनिटाला गोल केला.