यावल : तालुक्यातील कोळन्हावी तापी नदी पुलावर 9 एप्रिल रोजी 35 वर्षीय तरुणाचा अपघात झाला होता. या अपघातात गंभीर जखमी तरुणावर जळगाव रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान तरुणाचा झाला. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. नामदेव श्रावण साळुंके (35) असे मयताचे नाव आहे.
जखमी तरुणाचे अखेर निधन
नामदेव साळुंके हा तरुण 9 एप्रिल रोजी कोळन्हावी जवळील तापी पुलावर दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाला व पुलावर तो बेशुद्ध अवस्थेत पडला असताना किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मनिषा महाजन यांनी थांबून त्याच्यावर प्रथमोपचार केले. जळगावचे आमदार राजूमामा भोळे यांनी त्यास जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवले असता 10 एप्रिल रोजी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. नम्रता अच्छा यांनी दिलेल्या खबरीनुसार शुक्रवारी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार नरेंद्र बागुले करीत आहेत.