भुसावळ (प्रतिनिधी) – दीपनगर प्रकल्पातील कोळसा हाताळणी विभागाच्या यार्डात एका मालगाडीचा डबा अचानक यार्डात रेल्वे रू ळावरून घसरल्याची घटना मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे यार्डातील रेल्वे वाहतुकीवर कुठलाही परीणाम झाला नाही.
कोळसा पुरवणारे वॅगन घसरले
दीपनगर प्रकल्पाला दररोज मालगाडीद्वारे कोळसा पुरवला जातो. मंगळवारी सकाळी प्रकल्पात जाणार्या मालगाडीचा एक डबा (वॅगन) रूळाखाली घसरून डबाही कलंडला. या प्रकारात कुठलीही जीवीतहानी झाली नसलीतरी रेल्वे प्रशासनाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. दुपारनंतर कलंडलेला डबा व निखळलेली चाके उचलण्यासाठी मलकापूर येथे शक्तीशाली महाबली के्रन बोलावण्यात आली.