कोळी समाजातील १२० गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव

0
जळगाव:जळगाव जिल्हा कोळी समाज माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बहुउद्देशिय मंडळातर्फे कोळी समाजातील १२० गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला़ हा गुणगौरव सोहळा स्व़ बिंदुबाई सोनवणे मंगल कार्यालयात रविवारी सकाळी ११ वाजता पार पडला़ याप्रसंगी विद्यार्थ्यांसह पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती़
गुणगौरव कार्यक्रमाच्या अध्यस्थानी प्रभाकर सोनवणे हे होते़ तर व्यासपीठावर किशोर बाविस्कर अशोक सपकाळे, कैलास सोनवणे, गोपाळ तायडे, पुंडलिक सपकाळे, एल़बी़ तायडे, आऱडी़सोनवणे, ए़व्ही़सैदाणे आदी मान्यवर उपस्थित होते़ दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली आहे़ प्रास्ताविक प्रभाकर सोनवणे यांनी केले़ त्यांनी त्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्जल भविष्यासाठी उच्च शिक्षण घेण्याचे आवाहन केले़
१२० विद्यार्थ्यांचा गौरव
कोळी समाजातील दहावी,बारावी, पदवी, पदविका, डॉक्टर, इंजिनिअरींगच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले़ सोबतच विविध क्षेत्रात विशेष नेपूण्य प्राप्त केलेले शरद सैंदाणे, मिताली कोळी, आकाश ठाकरे, विजय कोळी, प्रवीण ठाकरे, तुषार रायसिंग, तेजस तायडे, प्रशांत सोनवणे, लक्ष्मण सपकाळे, धनंजय सपकाळे, किर्ती बाविस्कर आदी विद्यार्थ्यांच्या विशेष सत्कार मान्यवरांकडून करण्यात आला़ यानंतन नवनिर्वाचित नगरसेकवांचा देखील शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस़एम़रायसिंग यांनी तर आभार हेमेंद्र सपकाळे यांनी केले़ .