कोळी समाज जिल्हा युवा उपाध्यक्षपदी प्रवीण कोळी

0

धानोरा । अखिल भारतीय युवा कोळी समाज जळगाव जिल्हा युवा उपाध्यक्ष पदी तालुक्यातील पंचक येथील प्रविण देवचंद कोळी यांची निवड करण्यात आली आहे. यासंदर्भात प्रदेश अध्यक्ष परेश कोळी यांच्या आदेशानंतर युवा प्रदेश कार्याध्यक्ष संजीव पांडुरंग शिरसाठ यांनी ही निवड केली आहे. भाईसाहेब कोळी राष्ट्रीय उपाध्यक्ष, हरिचंद्र मढवी, प्रदेश सरचिटणीस, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे आदींनी अभिनंदन केले आहे.

अखिल भारतीय युवा कोळी समाज जळगाव जिल्ह्यात गाव तेथे शाखा निर्माण करू, तसेच जिल्हास्तरावर कोळी समाजाच्या युवकासांठी पेरणादायी उपक्रम राबवु, शासनाच्या विविध योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असेल, असे प्रविण कोळी यांनी सांगितले.