कोहली भडकल्याने स्मिथने धरला पॅव्हेलियनचा रस्ता

0

बेंगळुरू । भारताचा कर्णधार झाल्यानंतर आपल्या स्वभावात शांतपणा आणलेल्या विराट कोहलीने आज सामन्यात दरम्यान विराट कोहलीचे आक्रमक रूप बर्‍याच दिवसांनी पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ हा बाद झाला होता. तो ‘डीआरएस’ वरून रडीचा डाव केल्याचे पाहून विराटची भडकला आणि तो अंपायरच्या दिशेने धावला.त्याचा हा पवित्रा पाहून स्मिथने गुपचूप पॅव्हेलियनचा मार्ग धरला आणि मग पंचांनी कोहलीला शांत केले.

कोहलीने हरकत घेतली
बेंगळुरू कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाला 188 धावांचे आव्हान दिले होते. ऑस्ट्रेलियाने 21 ओव्हरमध्ये 3 बाद 73 धावांपर्यंत मजल मारली होती. कर्णधार स्टीव्ह स्मिथ पीचवर असल्याने सामन्याचे पारडे ऑस्ट्रेलियाच्या बाजूने होते.त्याच्या विकेटसाठी गोलंदाज झटत असतानाच, उमेश यादवचा झंझावाती चेंडू स्मिथच्या पॅडवर आदळला. पंचांनी त्याला यष्टिचित ठरवले आणि विराटसेना उसळलीच. ’कॅप्टन कोहली’ तर भलताच जोशात होता.

तेव्हाच, स्टीव्ह स्मिथने ’डीआरएस’ अपील करण्याबाबत नॉन-स्ट्राइकवरच्या फलंदाजाचे मत विचारले. पण, तोही ठाम नसल्याने स्मथने ड्रेसिंग रूमकडे पाहिले आणि खुणेनंच त्यांचा अभिप्राय विचारला. या खाणाखुणा पाहून विराट भडकलाच. डीआरएसच्या नियमानुसार, तिसर्‍या अंपायरकडे अपील करायचे की नाही, हे ठरवताना तुम्ही ड्रेसिंग रूमची बिलकूल मदत घेऊ शकत नाही. पण स्मिथ नेमके तेच करत होता. त्यावर कोहलीने हरकत घेतली. पण, त्याचा एकंदर आविर्भाव पाहून स्मिथने काढता पाय घेतला.