कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले पेटवून

0

जळगाव – पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील 50 वर्षीय महिलेने आपल्या घरातील कौटुंबिक वादा झाल्याने राहत्या घरात स्वत:च्या अंगावर
रॉकेल ओतून पेटवून घेतल्याची घटना रविवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली असून त्यांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रूग्णालयात
उपचारार्थ दाखल करण्‍यात आले असून यात त्या 95 टक्के भाजल्या गेल्या आहे. याबाबत माहिती अशी की, संगिता वसंत महाले
(वय-50) रा.नांद्रा ता.पाचोरा यांच्यासह पती वसंत महाले यांच्या सोबत घरघुती कारणावरून वाद झाले. या वादातून रागाच्या भरात त्यांनी
सकाळी 7 वाजेच्या सुमारास स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. त्यांनी तातडीने जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात
आले. या घटनेत विवाहिता 95 टक्के भाजल्या गेल्या आहे.