जळगाव । शहरतील कंजरवाड्यात कौटुबिक वादातून विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान नातेवाईंकानी शवविच्छेदन न करण्यासाठी तीन तास गोंधळ घातला. पोलीसांनी समजुत घातल्यानंतर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला होता. रुग्णालयात गर्दी निर्माण झाल्याने तणावाची परिस्थीती निर्माण झाली होती.
मुले बाहेर खेळत असतांना घरात घेतली गळफास
शहरातील कंजरवाडामधील संजय गांधी नगरमध्ये सलोनी विश्वास गारुंगे (वय 33) ह्या पती विश्वास अरुण गारुंगे (वय 38), मुलगा रोहन (वय 15), रजीत (वय 12), अलोश (वय 9) यांच्यासह राहतात. विश्वास गारुंगे यांचे मोठे भाऊ अनिल गारुंगे यांचे दि.26 जानेवारी रोजी निधन झाले. तीसरे आटोपल्यानंतर नंदुरबार येथील नातेवाईंकाना रेल्वे स्थानकावर विश्वास गारुंगे सोडण्यासाठी दुपारी 11.30 वाजेच्या सुमारास गेले. यावेळी घरी सलोनी गारुंगे यांच्यासह मुले एकटीच होती. मुले बाहेर खेळत असतांना पार्टशनच्या घरातील लाकडी बल्लीला गळफास घेत सलोनी यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्या केल्याचे उघडकिस आल्यानंतर खाजगी रुग्णालयात नातेवाईकांनी सलोनी यांना नेले. याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. यावेळी सलोनी यांची आई व माहेरच्यांनी एकच आक्रोश केला.
नातेवाईकांचा पोलीस ठाण्यांमध्ये गोंधळ
सलोनी यांचे भाऊ किशोर प्रकाश माचरे यांचा मुलगा आकाश माचरे यांच्या काही महिलांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. याठिकाणी सासरच्या मंडळींकडून सलोनी यांना छळ होत असल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला. याठिकाणी सासर व माहेरच्या मंडळींना समाजातील प्रतिष्ठांनी समजूत काढली. तर शवविच्छेदन न करण्यासाठी सुमारे तीन नातेवाईंकानी गोंधळ घातला. अखेर सपोनि सचिन बागूल, पोउनि समाधान पाटील, पोहेकॉ भरत लिंगायत यांनी नातेवाईंकाची समजूत घातली. सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास सलोनी यांच्या मृतदेहावर शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.