कौन बनेगा ज्ञानपती’त ग्रॅहम बेल गट अव्वल

0

म्हाळुंगे इंगळे प्राथमिक शाळेत विनादप्तर शाळा उपक्रम

म्हाळुंगे इंगळे : येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत कौन बनेगा करोडपती’? या धर्तीवर आधारीत कौन बनेगा ज्ञानपती’ या उपक्रमात पहिला क्रमांक इयत्ता सहावीतील ग्रॅहम बेल या गटाने पटकवाला आहे.या शाळेत प्रत्येक शनिवारी विना दप्तर शाळा’ या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणारे विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबवले जात असून त्याचा कौन बनेगा ज्ञानपती’ त्यातीलच एक भाग असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक दत्तू भालचिम यांनी सांगितले.

चालु घडामोडींवर प्रश्‍न
दैनंदिन परिपाठामध्ये सामान्य ज्ञानाचे तीन प्रश्‍न दिले जातात. ते विद्यार्थ्यांकडून पाठ करून घेतले जातात. वर्षभराच्या 495 प्रश्‍नांवर आधारित व चालू घडामोडींवर आधारीत हा उपक्रम राबविण्यात आला. इयत्ता पाचवी ते सातवी मधील विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला होता. सर्व विद्यार्थी उत्साहपूर्ण अचूक उत्तरे देत होती. इयत्ता पाचवी ते सातवीचे तुकडी निहाय एकूण सात गट करून त्या गटांना शास्त्रज्ञांची नावे देण्यात आली होती. यात ज्ञानपतीचा प्रथम मान तो इयत्ता सहावीच्या ग्रॅहम बेल गटाने पटकावला. या गटात गौरव राजेंद्र शिंदे, आदित्य महादेव उपासे, पुजा गंगाधर सज्जन हे विदयार्थी होते. त्यांना मार्गदर्शन वर्गशिक्षक धनराज अचवलकर यांचे लाभले.

विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग
दुसरा मान मिळाला तो इयत्ता सातवीच्या होमी भाभा’ या गटाला. या गटात सत्यम सुनिल गुप्ता, पुष्पेंद्र इम्रतसिंह ठाकूर, रोहित बापुराव राठोड हे विद्यार्थी सहभागी झाले होते. वर्गशिक्षिका मंदाकिनी शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. तिसरा मान मिळाला तो इयत्ता सातवीच्या जेम्स वॅट’ या गटाला. या गटात आश्‍विनी पाटे, हर्षदा नांदे, आकांक्षा शिंदे हे विद्यार्थी सहभागी झाले होते. या गटाला वर्गशिक्षिका संगीता आडके यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेचे परिक्षक व नियोजन चांगुणा सोनवणे, विजया मेहर व रेखा बोत्रे यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी महाळुंगकर व भागवत आव्हाड यांनी केले.