कौमी एकता पुरस्कार इसाक बागवान यांना जाहीर

0

पिंपरी-चिंचवड : आकुर्डीतील बीना एज्युकेशन सोसायटीच्या वतीने देण्यात येणारा 2017 चा कौमी एकता पुरस्कार मुंबईचे निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त इसाक इब्राहीम बागवान यांना जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण रविवारी (दि.7) सायंकाळी 6 वाजता बीना इंग्लिश मिडीयम स्कुलच्या मैदानावर होणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. अशी माहिती सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष इकबाल खान यांनी पिंपरीत पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेचे सचिव रफीक आतार, मुख्याध्यापिका समीना मोमीन, खजिनदार हमजा खान, सरचिटणीस आझम खान, विश्‍वस्त मतलूब उस्मानी, अकमल खान, अब्दुलाह खान आदी उपस्थित होते.

बागवान निवृत्त एसीपी
पुरस्काराचे वितरण कर्नल इर्षाद अहमद खान यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे आणि प्रमुख पाहुणे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतिश पाटील आदी उपस्थितीत राहणार आहेत. बागवान यांना आतापर्यंत तीन राष्ट्रपती शौर्यपदकांनी सन्मानित करण्यात आले आहे. मुंबईतील गुन्हेगारी जगतावर प्रकाशझोत टाकणारे ‘बेमिसाल’ हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. त्यांनी एकूण पस्तीस वर्षे पोलिस खात्यात सेवा केली. 1984 साली मन्या सुर्वे याचा मुंबईत एन्काऊंटर केला. 26/11 च्या मुंबईच्या दहशतवादी हल्ला परतवून लावण्यात बागवान यांनी महत्वपुर्ण कामगिरी केली. अशी माहिती इकबाल खान यांनी दिली.