माहिती दिल्यावरून डॉक्टरला तिघांकडून मारहाण; गुन्हा दाखल
धुळे – शहरातील बोरसे कॉलनी लगत असलेत्त्या शब्बीर नगरातून पोलिसांच्या क्युआरटी पथकाने 20 गायींसह तीन वासरांची सुटका केली आहे. याबाबतची माहिती पोलिसांना पुरविल्याच्या कारणावरून आरोपींनी तुळशीराम नगरातील वैद्यकिय व्यावसायिकाला मारहाण करून त्यांच्या खिशातील रोकड आणि दोन मोबाईल,एटीएमकॉर्ड हिसकावून नेल्याची घटना घडली. पोलिस मुख्यालयातील पो.कॉ.धिरज गवते यांनी दिलेत्त्या फिर्यादीनुसार बोरसे कॉलनी लगत असलेत्त्या शब्बीरनगरात मोहंमद अहमद रशीद याने कोठूनतरी गायी चोरून आणून विक्रीसाठी वा कत्तलीसाठी घराच्या आडोशाला आणून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या क्युआरटी पथकाने दुपारी 1.30 वाजता छापा टाकून सूमारे 1 लाख 11 हजार रूपये किंमतीच्या 20 गायी आणि तीन वासरांची सुटका केली. या च्रकरणी मोहंमद विरूद्ध चाळीसगांव रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांना माहिती दिल्याच्या कारणावरून मोहंमद सह पाच जणांनी एका डॉक्टरला मारहाण करून लुटल्याची घटना घडली. शिवाजी हौसिंग सोसायटी, तुळशीराम नगर येथे राहणार्या योगेश रावण पाटील (वय 39) या डॉक्टरने चाळीसगांव रोड पोलिसात दिलेत्त्या फिर्यादीनुसार डॉ.पाटील यांनी मोहंमद याच्या घराजवळ असलेल्या गायी आणि वासरांबाबतची माहिती पोलिसांना दिली या कारणावरून दुपारी 2 वाजेघ्या सुमारास मोहंमद , जावेद आणि अन्य तिघांनी डॉक्टर पाटील यांना मारहाण करून जखमी केलेे. तसेच त्यांच्या खिशातील दोन मोबाईल 9 हजार 300 रूपयांची रोकड,एटीएम कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, आरसी बुक हिसकावून घेतले. चाळीसगांव रोड पोलिसांनी आरोपींविरूद गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय पांढरकर करीत आहेत.