आज सर्व सरकारी कार्यालयात क्रांतिकारक उमाजी नाईकांची जयंती
मुंबई (निलेश झालटे)। भारताच्या इतिहासात अनेक क्रांतिकारकांचे योगदान अफाट आहे. मात्र अनेक क्रांतिकारकांच्या स्मृती सरकार दरबारी आजही उपेक्षित दिसून येतात. सलग 14 वर्ष इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे क्रांतिकारक उमाजी नाईक असेच एक नाव. देशाला स्वातंत्र्य मिळावे आणि रामोशी, बेरड समाज मुख्य प्रवाहात यावा यासाठी ते विशेष लक्षात राहतील. केवळ याच समाजासाठी नव्हे तर वंचित घटकांचा मसिहा अशी त्यांची ओळख. या क्रांतिकारकाला स्वातंत्र्याच्या 60 वर्षांनंतर सरकार दरबारी न्याय मिळाला आहे. आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांनी जयंती पहिल्यांदा शासन स्तरावर साजरी केली जाणार आहे. तसेच भिवडी, पुरंदर जिल्हा पुणे येथे 5 लाख लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार असल्याची माहिती ओबीसी विभागाकडून मिळाली आहे.
स्मारकासाठी 2 कोटींचा निधी
राज्यातील सर्व सरकारी कार्यालयात कार्यालयात साजरा होणार असल्याची माहिती विभागाकडून मिळाली आहे. उमाजी नाईकांनी जन्मदिवस साजरा व्हावा व त्यांचे स्मारक उभारावे या मागण्या समाजबांधवांनी लावून धरल्या होत्या. या पार्श्वभूमीवर 1 कोटी जिल्हा नियोजन समितीकडून तर शासनाकडून 1 कोटी असे 2 कोटी स्मारकासाठी दिले असल्याची माहिती देखील विभागाकडून मिळाली आहे. तसेच वसंतराव नाईक महामंडळाच्या अंतर्गत विमुक्त जाती, इतर मागासवर्ग, भटक्या विमुक्त जमातींना लघुउद्योगांना व्याजरहीत 1 लाख रुपये कर्जाची योजना प्रस्तावित असल्याचे सांगितले आहे.
विमुक्त जाती, इतर मागासवर्ग, भटक्या विमुक्त जमातींना लघुउद्योगांना व्याजरहीत 1 लाख रुपये कर्जाची योजना प्रस्तावित 80 लाख लोकसंख्रेच्रावतीने जरंती उपक्रमासाठी 22 संघटनांचे एकत्रित आंदोलनाला यश
स्मारकाबाबत सकारात्मक निर्णय
राज्यात रामोशी आणि बेरड समाजाची 70 ते 80 लाख लोकसंख्या आहे. या समाजाकडून वीर उमाजी नाईक यांची जयंती दरवर्षी साजरा केला जातो. तसेच या महान क्रांतिकारकाच्या स्मृतींना सन्मान मिळावा आणि अन्य मागण्यांसाठी अनेक आंदोलने केली आहेत. यासाठी 22 संघटना विविध मागण्यांसाठी एकत्रित आल्या आहेत. यावर मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन चर्चा देखील केली असल्याची माहिती आहे. दरम्यान 7 सप्टेंबर रोजी जयंतीच्या पार्श्वभूमीवर समाजबांधवांच्या भावना लक्षात घेऊन जयंती साजरी करणे आणि स्मारकाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात
आला आहे.