राज्यघटनेवर आधारीत पुस्तकाची दिली भेट
चिंचवड : शिक्षकदिनाचे औचित्य साधून क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीने ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणप्रेमी रमेशजी पतंगे लिखित ‘आम्ही आणि आमचे संविधान’ या पुस्तकाची प्रत, गुलाबपुष्प व रुचकर, असा अल्पोपहार देऊन समितीमध्ये काम करणार्या सर्व शिक्षकांचा गौरव केला. यावेळी समितीच्या उपाध्यक्षा शकुंतला बन्सल, कार्यवाह अॅड. सतिश गोरडे सर्व विभागाचे शाळा समिती अध्यक्ष गतिराम भोईर, अशोक पारखी, नीता मोहिते आदी उपस्थित होते. यानिमित्ताने समितीच्या शिक्षण विभागातील शिक्षक स्मिता जोशी (क्रांतिवीर चापेकर विदया मंदिर चिंचवड) कृतिका कोरम (खिंवसरा पाटील शिक्षण संकुल थेरगाव), महाजन (लोकमान्य टिळक विदयालय थेरगाव) सतिश अवचार (पुनरुत्थान समरसता गुरुकुलम) यांनी प्रातिनिधिक स्वरुपात मनोगत व्यक्त केले.
शालेय शिक्षकांचे योगदान
हे देखील वाचा
पुणे इंजिनिअरिंग कॉलेज (उ.ज.ए.झ.) चे उपसंचालक प्रा.भालचंद्र चौधरी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, सर्वांगीण विकासात महाविदयालयीन शिक्षकांपेक्षा शालेय शिक्षकांचे योगदान अधिक महत्वाचे ठरते. शालेय जीवनात त्याच्या व्यक्तिमत्वाला पाडलेले पैलूच त्याचे भविष्य ठरवतात अर्थात हे करण्यासाठी आजच्या तंत्रज्ञानयुगात शिक्षकाचे अस्तित्वच मुळी धोक्यात आहे. मात्र, मायेच्या स्तरावर जाऊन शिकवणारे शिक्षक अस्तित्वात आहेत तोपर्यंत काळजीचे कारणही नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांच्या संकल्पनेतून साकारलेले पुनरुत्थान समरसता गुरुकुलम म्हणजे छोट्यांचे तंत्रज्ञान महाविदयालयच आहे, असा गौरवपूर्ण अभिप्राय त्यांनी दिला.
चिंचवड येथे झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी अध्यक्षस्थानी गिरीश प्रभुणे यांनी शिक्षकदिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, शिक्षक आपल्या रोजच्या जीवनातही राज्यघटना कशी उपयुक्त आहे, हे सांगितले. शिवाय भेट दिलेल्या पुस्तकाचा अभ्यास करून आजचा विदयार्थी भविष्यातील सक्षम, जबाबदार नागरिक घडविण्याचे कार्य शिक्षकांच्या हस्ते घडावे ही अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथींचा परिचय शालासमिती अध्यक्ष गतिरामजी भोईर यांनी करुन दिला तर त्यांचे स्वागत कार्यवाह अॅड. सतिश गोरडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालासमिती अध्यक्षा नीता मोहिते यांनी केले. सूत्रसंचालन कल्पना बिचकुले हिने केले तर आभार नितीन बारणे यांनी मानले.