क्रांतीकारकांचे बलिदान देशवासियांना स्फूर्तीदायी : अ‍ॅड. कांबळे

0

शहिददिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

चिंचवड : शहिद भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव या क्रांतीकारकांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी बलिदान दिले आहे. त्यांचे हे बलिदान तमाम देशवासियांना स्फूर्तिदायी ठरणार आहे, असेे प्रतिपादन अ‍ॅड. वसंत कांबळे यांनी केले. पिंपळे गुरव येथील गुरुशोभा सामाजिक संस्थेच्यावतीने सृष्टी हॉटेल चौकात शहिद दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन माजी नगरसेविका शोभा आदियाल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी प्रा. मुकेश पवार, तानाजी जवळकर, अमरसिंग आदियाल, नयन अहिरे, सुनिल दिवाणजी, लक्ष्मी आदियाल, द्रोपदी रंधवे, दिपाकौर आदियाल, नितीन कदम, समशेर चौहान, सुशिल चव्हाण, रमा कांबळे, अंजू नखाते, सुजाता निकाळजे, शाम जगताप, राजेंद्र जगताप, शिवलाल कांबळे, मुकेश पवार आदी उपस्थित होते. प्रा. मुकेश पवार यांनी क्रांतीकारी शहिदांच्या लढ्यांची माहिती दिली. स्वागत अमरसिंग आदियाल यांनी केले. तर आभार तानाजी जवळकर यांनी मानले.