क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

0

नवी मुंबई : नवी मुंबईत एका क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नवी मुंबईच्या घणसोली येथे ही घटना घडली असून संदीप म्हात्रे असे क्रिकेटपटूचं नाव आहे. सामन्या दरम्यान गोलदांजी करणाऱ्या संदीपच्या छातीत दुखायला लागले होते. षटक पूर्ण करून सामना अर्धवट सोडून संदिपला घरी नेले. घरी गेले असता संदीपचा मृत्यू झाला आहे. संदीप हा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जायचा.