जळगाव। क्रिकेट टुर्नामेंन्टच्या वादातून शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ तरूणावर चाकू हल्ला झाल्याची घटना सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली असून पोटात चार वेळा चाकु भोसकल्याने तरूण गंभीर जमखी झाला आहे. दरम्यान, हल्लेखोरांनी तरूणावर वार केल्यानंतर त्याच्याजवळ असलेले 31 हजार रूपये हिसकवून पळ काढला. मेहरूण परिसरातील गुरूदत्तनगर येथील रहिवासी फिरोज खान नईम खान (वय-38) हे बांधकाम मजून असून यांनी 8 ते 11 एप्रिल दरम्यान रायसोनी नगरात मोलाना अब्दूल कलाम आझाद वेलफेअर एज्युकेशन क्रिकेट टुर्नामेंन्ट स्पर्धा भरवली होती. यावेळी स्पर्धेत 32 संघानी सहभाग नोंदविला.
बक्षीसाचे पैसे मागितले…
विजेत्याला 51 हजारांचे तर उपविजेत्यास 31 हजारांचे बक्षिस ठेवण्यात आले होते. अखेर स्पर्धा होवून तांबापूरा संघ व आयोजक फिरोज यांचा संघ हे अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले होते. परंतू कारणास्तव अंतिम सामना होवू शकला नाही. यामुळे फिरोज खान व तांबापूरास संघाचे खलील उस्मान यांच्यात अंतिम सामना का होत नाही यावरून वाद झाला होता. आज वीस ते बावीस दिवसानंतर गुरूवारी सकाळी फिरोज हा रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ कामगारांसोबत इतर कामगारांची जोशी वाड्यातील बांधकाम साईडवर जाण्यासाठी वाट पाहत होता. त्याच वेळी खलील उस्मान हा सात ते आठ जणांनी टोळी घेवून आला आणि फिरोज याला आमचे बक्षीसाचे 51 हजार रुपये आताच दे असा दगादा लावला.
तरूणाला बेदम मारहाण
अंतिम सामना झाला नसून पैसे केसे देवून असे फिरोज याने सांगताच खलील याने वाद घातला. यानंतर खलील व त्याच्यासोबत आलेल्या तरूणांनी फिरोज याला बेदम मारहाण करून पोटात चाकु भोसकला. दरम्यान, चार वेळा चाकू भोसकल्याने फिरोज हा गंभीर जखमी झाला. त्याच्याजवळ असलेले 31 हजार रुपये हल्लेखोरांनी हिसकवून तेथून पळ काढला. अफसर शेख, आसीफ शेख, जाकीर ठेकेदार, विठ्ठलभाऊ यांनी फिरोज याला रक्तबंबाळ अवस्थेत उचलून रिक्षात बसविले आणि जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात जखमी तरूणाचे जबाब नोंदवून घेतले.