भुसावळ । येथील नानासाहेब देविदास फालक स्पोर्टस् अकादमी आयोजित ऑल इंडिया टी-20 क्रिकेट टुर्नामेंटमध्ये दोन सामने खेळविण्यात आले. त्यात पहिला सामना जालना कान्हे विरुध्द रेल्वे आरपीएफ इलेव्हनमध्ये झाला. नाणेफेक जिंकून फलंदाजी करीत 157 धावांचे लक्ष्य रेल्वे आरपीएफ इलेव्हनला दिले. त्यांनी फक्त 90 धावा करीत संपूर्ण संघ बाद झाला व जालना कान्हेने हा सामना 66 धावांनी जिंकला.
सामनावीर म्हणून जुबेर कुरेशी या खेळाडूला निवडण्यात आले. त्याने 47 चेंडूत 93 धावा केल्या. यावेळी दुसर्या सामन्यात औरंगाबाद विरुध्द नाशिक अकादमी यांच्यात झाला. नाणेफेक औरंगाबादने जिंकून 114 धावांचे लक्ष्य नाशिक अकादमीला दिले. नाशिक अकादमीने हा सामना 5 गडी राखून जिंकला. या सामन्यात सामनावीर म्हणून अभिषेक राऊत याला निवडण्यात आले. त्याने 4 षटकात 13 धावा देत 3 गडी बाद केले. यावेळी दिनेश जोगदंड, प्रतिक नन्नवरे उपस्थित होते. दोन्ही सामन्यात शुभम शर्मा, उदय सोनवणे, सुरज मायटी, अक्षय शर्मा यांनी मैदानावरील कामात सहभाग घेतला.