परंदवाडीतील मैदानावर झाले स्पर्धेचे उद्घाटन
तळेगाव दाभाडे : प्रशांत वहिले प्रतिष्ठान क्रिकेट क्लबच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मावळ तालुका क्रिकेट टी 20 स्पर्धा वेदांत ग्राउंड-परंदवाडी येथे सुरु आहेत. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक अनिलशेठ मालपोटे, नगरसेवक चंद्रजीत वाघमारे, विवेक गुरव, निवृत्त नायब तहसीलदार किसनराव व हिले, उद्योजक एकनाथराव पोटफोडे, माजी सरपंच पोपटराव वहिले, अशिष पुरोहित, रो हिदास धामनकर, रजनीश ढोरे आदी उपस्थित होते.
हे देखील वाचा
16 संघाची निवड करण्यात आली
या स्पधमध्ये एकूण 26 संघातुन 16 संघाची निवड करण्यात आली. मावळ व शहरातील संघांनी स्पर्धेत भाग घेतला. उदघाटनाच्या दिवशी जेसीबी, तळेगाव ट्रेकर, प्रशांत वहिले, आनंद येवले क्लब, डॉक्टर इलेव्हन, व ड ्रीमटीम या संघाचे सामने झाले. स्पर्धेचे आयोजन प्रशांत वहिले क्रिकेट क्लबचे अध्यक्ष रोहित गिरमे, कार्याध्यक्ष संतोष खैरे, कार्यक्रम प्रमुख किरण धाडवे, व्यवस्थापक शैलेश वहिले, सचिव अमोल ठोंबरे, युवराज गोळे प्रशांत जाचक, अजय आंबेकर, सतिश म्हाळसकर, रोशन मोरे, पुरंदर शेट्टी, प्रमोद चव्हाण, सुरज टकले, शेखर ढोरे, दिनेश भसे,दत्ता पवार, प्रफुल्ल चौधरी, प्रतीक भाटीया, आनंद चव्हाण आदींनी केले. संक्षिप्त धावफलक : जेसीबी 9 बाद 100 धावा 18 षटकात ( अमित मोरे -27, नवनाथ -11, माने 3/19,माळी 3/16 ) पराभुत वि विजयी तळेगांव ट्रेकर्स 4 बाद 101 धावा 13 षटकात ( माने -21,सिध्देश – 21,गणेश 2/28, उमेश 1/6). प्रशांत वहिले : 4 बाद 143 धावा 20 षटकात ( अमोल ठोंबरे – 40, प्रफुल्ल – 29, मयूर – 21, प्रतिक भाटीया – 20, महेंद्र 3/10 आनंद येवले 1/23) विजयी वि पराभूत आनंद येवले क्लब : सर्वबाद 89 धावा 17.2( प्रदिप- 21 अतुल- 9, प्रशांत जाचक 4/8,शैलेश वहिले 2/18).