मुंबई : ह्रतिक रोशनच्या ‘क्रिश’ सिरीजचा चौथा भाग लवकरच तयार करण्यात येणार आहे. ह्रतिक फक्त एक पाऊल दूर असल्याचे सांगत, त्याने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमधून त्याने ‘क्रिश ४’ची घोषणा केली आहे. ‘कोई मिल गया’ हा क्रिश सिरीजचा पहिला भाग होता. या चित्रपटाने लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवले. त्यानंतर ‘क्रिश’ आणि क्रिश-३ची निर्मिती करण्यात आली. ‘क्रिश’ मधून ह्रतिकने ‘सुपरहिरो’ साकारला. या चित्रपटांचीही प्रचंड क्रेझ पाहायला मिळाली.
क्रिश-४ मध्ये ‘जादू’ आणि क्रिशची पुनर्भेट होणार आहे. त्यामुळे ‘जादू’ला पाहण्यासाठी प्रेक्षकही आतूर आहेत.