जळगाव । महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी सलग दुसर्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल जळगाव जिल्हा क्रीडा महासंघातर्फे नुकताच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नागरी सत्कार करण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील सर्व क्रीडा संघटनांनी एकत्र येऊन हा गौरव समारंभ आयोजित केला होता.