जळगाव । नाशिक येथील अशोका बिल्डकॉन लिमिटेड कंपनी अधिकारी खाजगी कामानिमित्त जळगावी आले होते. त्यांनी त्यांची कार जिल्हा क्रीडा संकुलाजवळ उभी केली होती. दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास त्यांच्या कारच्या मागील सिटवर असलेली लॅपटॉप बॅग अज्ञात चोरट्यांनी लांबवून नेली. या बॅगमध्ये दोन लॅपटॉप, हार्डडिस्क, वायफाय राऊटर, चेकबुक यासह कंपनीची महत्वाची कागदपत्रे होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. दरम्यान पोलिसांनी संशयिताचे रेखाचित्र जारी केले आहे. याबाबत प्रत्यक्षदर्शीं मिळालेली माहिती अशी की, अशोका बिल्डकॉन लिमिटेड कंपनीला जळगाव-चाळीसगाव रस्त्याचे काम मिळाले असल्याने लेबल लायन्ससाठी कंपनीचे अधिकारी नितीन तुकाराम नंदनवार रा. नाशिक यांच्यासह अधिकारी व चालक सिध्दार्थ पांडे हे तिघे एमएच 15 बीएक्स 7094 क्रमांकाच्या कारने कामानिमित्त जळगावी आले होते. त्यानंतर लेबल लायन्सनचे काम असल्याने त्यांनी त्यांची कार जिल्हा क्रीडा संकुलाजवळ लावली होती. नितीन नंदनवार व त्यांचे सहकारी कामानिमित्त ऑफीसमध्ये गेले होते.कारच्या मागच्या सिटवर लॅपटॉप बॅग ठेवलेली होती. यावेळी चालक सिध्दार्थ पांडे हा कारमध्येच बसला होता. दोन तरुण याठिकाणी आले. यातील एकाने गाडीच्या पुढील बाजुला टकटक वाजून गाडीत बसलेल्या चालकाला खुणविले. काहीतरी झाले असे वाटल्याने चालक पांडे हा खाली उतरला. पुढे जावून पाहू लागला. तो पर्यंत दोन्ही तरुण याठिकाणावरून गायब झाले होते. काही वेळानंतर नितीन नंदनवार व त्यांचे सहकारी कारजवळ आले. त्यांना कारमधील लॅपटॉप बॅग दिसून आली नाही. त्यांनी चालकाला विचारले. चालकाला बर्याचवेळ काहीही समजून आले नाही. नंतर चालकाने दोन तरुण गाडीजवळ आले असल्याचे नंदनवार यांना सांगितले. त्यानंतर चालकासह नंदनवार यांनी जिल्हापेठ पोलिसात येवून याबाबत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.
पोलिसांनी तपासले सीसीटीव्ही फुटेज
जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप आराक यांच्यासह पथकाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून तात्काळ परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. परंतू सीसीटीव्ही कॅमेर्यात स्पष्टपणे काहीही दिसत नाही.
संशयिताचे रेखाचित्र जारी
इनोव्हा कारवरील चालक सिध्दार्थ पांडे याने संशयिताने पूर्णपणे पाहिले होते. त्याने सांगितलेल्या वर्णनावरून पोलिसांनी संशयिताचे रेखाचित्र रेखाटले. त्या अनुषंगाने पोलिस तपास करीत आहे. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.