जळगाव : शहरातील क्रीडा संकुलाजवळून दुचाकीवर बसलेल्या एकाने तरुणाच्या हातातील मोबाईल धुमस्टाईल लांबविला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
धूम स्टाईल मोबाईल लांबवला
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाजवळून रूपेश सुधाकर पाटील (31, जामनेर) हा तरूण रविवार, 5 जून रोजी दुपारी तीन वाजेयच्या सुमारास पायी जात असतांना दोन अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून मागून आले. दुचाकीवरील मागे बसलेल्या अनोळखी व्यक्तीने रूपेशच्या हातातील पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला. रूपेशने आरडाओरड केली तोपर्यंत दोन्ही अज्ञात भामटे दुचाकीवरून पसार झाले. रूपेशने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहे.