क्रेक्स्टाल स्नेहसंमेलनाचा पारितोषिक वितरणाने समारोप

0

जळगाव : सावदा येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मिडीअम स्कुलमध्ये क्रेक्सटाल 2016 चा पारीतोषिक वितरणाने थाटात समारोप झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध बहादर गितांवर नृत्यू सादर करून उपस्थितांची दाद मिळवून घेतली. गोदावरी फाऊंडेशन संचलित सावदा येथे डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मिडीअम स्कुलमध्ये स्नेहसंमेलनाचा समारोप समारंभ नुकताच पार पडला. या समारंभाला सर्जीकल स्ट्राईकमध्ये सहभाग राहीलेले कमांडंट सुनिल कदम यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील,गोदावरी पाटील, सुधाताई भंगाळे, संस्थेच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील, प्राचार्या भारती महाजन,डॉ उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरूड,जळगाव स्कुलच्या प्रिन्सीपल निलीमा चौधरी, डॉ उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम पाटील,भुसावळ स्कुलच्या प्राचार्या अनघा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

विविध बहारदार गितांवर नृत्य सादर
स्नेहसंमेलनात चिमुकल्या नर्सरी ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी एकल, समुह नृत्य सादर केले. तसेच गीत गायनाद्वारे विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुणांच्या आविष्काराचे दर्शन घडविले. समारोपीय समारंभात कमांडंट सुनिल कदम यांनी विद्यार्थ्यांचे कलाआविष्कार पाहुन त्यांचे कौतुक केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारीतोषिक वितरण करण्यात आले. यावेळी स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांसह पालकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान, विविध बहारदार गितांवर नृत्य सादर केली.