A person from Amalner taluka was duped for 67 thousand in the name of closing his credit card अमळनेर : तालुक्यातील पळासदरे गावातील एकाची क्रेडीट कार्ड बंद करण्याच्या नावाखाली 67 हजारात फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत संजय बाबुराव पाटील (51, रा.पळासदरे ता.अमळनेर) यांनी तक्रार दिली.
डिटेल्स देताच लांबवली रक्कम
सोमवार, 3 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास संजय पाटील यांना त्यांच्या मोबाईलवर मो.क्र.7667469470 वरील धारक इसम (नाव गाव माहीत नाही) याने फोन करीतन मी एसबीआयचा साहेब बोलत आहे, असे सांगितले. संजय पाटील समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावर बोलण्यावर विश्वास ठेवत त्यांच्याकडील एसबीआय बँकेच्या दोन्ही क्रेडीट कार्ड बंद करणे असल्याने क्रेडीट कार्डवरील 16 अंक असलेले आकडे व क्रेडीट कार्ड मागील बाजूस असलेले तीन अंकाचा सीव्हीव्ही क्रंमाक सांगितला. त्यानंतर मोबाईल क्रमाकावर प्राप्त झालेले सात वेळा आलेले ओटीपी विचारुन माझ्या दोन्ही क्रेडीट कार्डमधुन अंदाजे 67 हजार रुपयाची खरेदी करुन संजय पाटील यांची फसवणूण केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक राकेशसिंग परदेशी करीत आहेत.