ठेकेदाराशी हित जोपासत जनतेच्या पैशांची उधळपट्टी
हडपसर :- मुंढवा क्षेत्रीय कार्यालयातील अभियंत्या विजया राठोड यांनी प्रभाग क्र 23 मधील माननीयांच्या स्थानिक निधीतून ड्रेनेजलाईनचे अनावश्यक काम करण्याचा घाट घातला आहे.विकासकामाचे उद्घाटन झालेल्या नवचैतन्य ते फुलारे आळी या रस्त्यावर ड्रेनेजलाईनची सर्वसहमतीने नागरिकांची मागणी असताना, शेजारील अनावश्यक जागी परिसरातील नागरिकांच्या विरोधास न जुमानता मनमानी कारभार केला आहे.
एक वर्षांपूर्वीच झालेल्या ड्रेनेज कामाचे जागी व काँक्रीट रस्त्यावर ब्रेकर फिरवून जनतेच्या पैशांची होळी करण्याचा हेकेखोरपणा राठोड यांनी केला आहे. प्रभागात अनेक ठिकाणी आपल्या हेकेखोरीने नागरिकांना उलटसुलट अपमानकारक बोलत, नगरसेवकांना विश्वासात न घेता व ठेकेदारास बिल न काढण्याच्या धमक्या देत मनमानी कारभार सूरू केला आहे.
चालू आर्थिक वर्ष संपत आल्याने आल्याने परस्पर केवळ निधी संपविण्याचा हेतू ठेवत निकृष्ट दर्जांची कामे चालू आहेत. बहुतांशी नगरसेवकही हतबल झाले आहेत.तसेच संमधीत अधिकार्यावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.