खंडणीच्या गुन्ह्यातील नऊ महिन्यांपासून पसार महिला आरोपी जाळ्यात

0

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाची कामगिरी

भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात खंडणीच्या गुन्ह्यात तब्बल नऊ महिन्यांपासून पसार असलेल्या महिला आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने बुधवारी अटक केली आहे. राजकुमारी कलीम शेख (25, रा.दिनदयाल नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपी महिलेचे नाव आहे. या प्रकरणी दीपाली उर्फ वंदना अमित शर्मा (39, रा.दिनदयाल नगर, भुसावळ) यांनी 5 मार्च 2019 रोजी बाजारपेठ पोलिसात फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी महिला पसार झाली होती.

वेश्या व्यवसायासाठी धमकावले
संशयीत आरोपी सलीम शेख, ताराबाई, तस्लीम उर्फ काल्या व राजकुमार या चारही आरोपींनी फिर्यादीला वेश्या व्यवसाय करण्यासह दररोज 500 रुपये देण्यासाठी धमकावले होते तर 1 मार्च रोजी रात्री आरोपींनी अश्‍लील शब्दात शिविगाळ करीत पाच हजार रुपये खर्चासाठी मागत फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. जीवाच्या भीतीने फिर्यादीने आरोपींना पाच हजार रुपये दिल्यानंतर पोलिसात धाव घेतली होती.

गोपनीय माहितीवरून अटक
शहरात दिनदयाल नगर भागात आरोपी महिला आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक संदीप परदेशी, हवालदार जयराम खोडपे, नाईक रवींद्र बिर्‍हाडे, रमण सुरळकर, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, चेतन ढाकणे, महिला कर्मचारी गीता कश्यप व महिला होमगार्ड मीनाक्षी चौधरी, तृप्ती नारखेडे आदींच्या पथकाने महिलेला अटक केली. तपास हवालदार जयराम खोडपे करीत आहेत.