खंडणी मागणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल

0

नंदुरबार- उसनवारीची रक्कम परत करूनही वारंवार त्रास देणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की सिद्धिविनायक चौकात राहणारा मोहित मदन राजपूत याने विलास अशोक पवार यांच्याकडून उसने घेतलेलं 4 लाख रुपये परत केले असतानाही त्या रक्कमेची मागणी वारंवार केली जात होती. रक्कम दिली नाही तर दुखापत करण्याची धमकी देण्यात आली होती. अशी फिर्याद मोहित राजपूत याने शहर पोलिस ठाण्यात नोंदविली आहे. त्यानुसार विलास पवार यांच्या विरुध्द खंडणी मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.