खंडपीठासाठी वकिलांचे एकदिवसीय कामबंद आंदोलन

0

आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

पिंपरी : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुणे येथे व्हावे, या मागणीसाठी गुरूवारी पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेटस बार असोसिएशनच्यावतीने एकदिवसीय कामबंद आंदोलन करण्यात आले. बुधवारी पुण्यामध्ये कोर्ट बंद ठेवून आंदोलन करण्यात आले होते. खंडपीठ पुण्यामध्ये होण्यासाठी सर्व वकिलांनी आंदोलनाचे पवित्रा घेतला आहे. यावेळी अ‍ॅड. सुहास पडवळ, अ‍ॅड. अतिश लांडगे, अ‍ॅड. सुनील कड, अ‍ॅड. संजय दातीर पाटील, अ‍ॅड. गणेश राऊत, अ‍ॅड. प्रसन्ना लोखंडे, अॅड. सुनील कड, अ‍ॅड. विक्रम यादव आदी उपस्थित होते.

पुण्यावर अन्याय होतोय
यावेळी बोलताना पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेटस बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. राजेश पुणेकर म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने पुण्यास खंडपीठ देण्याचे आश्‍वासन दिले होते. पण ते खोटे ठरले. ही सरकारची नामुष्की असून वकिलांची व जनतेची फसवणूक आहे. कोल्हापूरला खंडपीठ मिळाल्याचा आनंदच आहे पण हायकोर्टात जाणारी सर्वात जास्त प्रकरणे ही पुण्याची असताना देखील पुण्यावर अन्याय होतो आहे. माजी अध्यक्ष अ‍ॅड. पडवळ म्हणाले की, काम बंद करण्याची वेळ शासनाने आणली आहे. या निष्क्रीय शासनास लवकर जाग न आल्यास व पुण्यास खंडपीठ न मिळाल्यास आंदोलन तीव्र करणार असल्याचे सांगितले.