खंडवा दरोड्यातील वॉण्टेड आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात

0

भुसावळ- खंडवा लोहमार्ग पोलिसात दरोड्याच्या गुन्ह्यात वॉण्टेड असलेल्या आरोपीस भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी शनिवारी अटक केली. नईम उर्फ भुर्‍या शहा रज्जाक शहा (24, रा.मुस्लिम कॉलनी, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. खंडवा लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक बी.एस.कोरव यांनी आरोपीविरुद्ध गुरनं. 209/2018 अंतर्गत 395 चा गुन्हा दाखल असल्याचे बाजारपेठ पोलिसांना कळवले होते. पोलीस उपअधीक्षक गजानन राठोड व निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अंबादास पाथरवट, हवालदार सुनील जोशी, कॉन्स्टेबल विकास सातदिवे यांनी आरोपीच्या खडका चौफुली परीसरातून मुसक्या आवळल्या.