अनेक गाड्या उशिराने धावणार ; पुणे-पनवेल एक्स्प्रेस रद्द
भुसावळ- मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील खंडाळा येथे मुख्य रेल्वे लाईनवरील इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामासाठी शनिवार, 18 रोजी ब्लॉक सकाळी 11.15 ते दुपारी पावणेतीन दरम्यान ब्लॉक घेण्यात येत आहे. या दरम्यान 12 पॉईंट मशिनीला वायरींग, सिग्नल टेस्टींग आदींसह अन्य कामे केली जाणार आहे. ब्लॉकमुळे अनेक गाड्या उशिराने धावणार असून अनेक गाड्यांचा मार्गात बदल करण्यात आला आहे शिवाय पुणे-पनवेल एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
अनेक गाड्या उशिराने धावणार, अनेकांचे बदलले मार्ग
गाडी क्रमांक 11014 कोईम्बतूर-एलटीटी एक्स्प्रेस 17 रोजी पुणे विभागातून तीन तास उशिराने धावणार आहे. गाडी क्रमांक 11026 पुणे-भुसावल एक्सप्रेस 18 रोजी कल्याणऐवजी दौंड-मनमाड मार्गे धावणार आहे तर गाडी क्रमांक 11017 एलटीटी-कराईकल एक्सप्रेसला 65 मिनिटांसाठी भिवपुरी रोडवर थांबवून ठेवण्यात येईल. गाडी क्रमांक 16351 सीएसएमटी-नागरकोइल एक्सप्रेसला नेरलमध्ये 73 मिनिटे थांबवण्यात येईल तसेच गाडी क्रमांक 17031 सीएसएमटी-हैदराबाद एक्सप्रेस 57 मिनिटांसाठी वांगणी येथे थांबवण्यात येणार आहे. दरम्यान, गाडी क्रमांक 51318 व 51317 पुणे-पनवेल-पुणे एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी गैरसोयीबाबत दखल घ्यावी व रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.