खंडेराव नगरात विजेच्या धक्कयाने सहा वर्षीय बालकाचा मृत्यू

0

वीजखांबावरुन तीघा घरांमध्ये उतरला वीजप्रवाह

जळगाव : घरात खेळत असतांना कुलरला स्पर्श झाल्याने विजेचा धक्क्याने 6 वर्षीय बालकाचा मृत्यु झाल्याची घटना 28 रोजी सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास खंडेराव नगर परिसरात घडली. आरव सुनिल भोई असे मयत बालकाचे नाव आहे. अंगणातील वीजखांबावरुन भोई यांच्यासह शेजारच्या तिघां घरांमध्ये वीजप्रवाह उतरला होता. मात्र वेळीच प्रकार लक्षात आल्याने महावितरणच्या कर्मचार्‍यांना बोलावून वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. अन्यथा आणखी कुणाला वीजेचा धक्का लागनू दुर्घटना घडली असती.

याबाबत मिळालेल्या महितीनुसार, सुनिल भोई हे पत्नी, 2 मुलांसह शहरातील खंडेराव नगरात राहतात. ते प्लंबर कारागिर असून त्यावर ते उदनिर्वाह भागवितात. 28 रोजी त्यांचा लहान मुलगा आरव हा सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास घरात खेळत होता. खेळत असताना त्याचा घरातील कुलरला स्पर्श झाला. कुलरमध्ये वीजप्रवाह उतरला असल्याने विजेचा धक्का लागून आरव दुरवर फेकला शॉक लागत तो दुर फेकला गेला. प्रकार लक्षात आल्यावर आरवला कुटुंबियांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रविण पाटील यांनी मृत घोषित केले. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आरव याचा नुकताच बालमोहन विद्यामंदिरात इयत्ता 1 लीत प्रवेश झाला होता. त्याच्या या अपघाती निधनामुळे भोई परिवारावर शोककळा पसरली आहे.

भिंतीसह तिघांघरामध्ये वीजपोलवरुन वीजप्रवाह
भोई यांच्या शेजारी राहूल दिलीप मिस्तरी राहतात. आरव याला विजेच्या धक्क्यांच्या घटनेनंतर आरडाओरड झाल्याने शेजारील महिलेने भोई यांच्याकडे धाव घेतली. घराबाहेर पडतांना तिला तिच्या गेटला स्पर्ध केल्यानंतर जोरदार वीजेचा धक्का बसला. यानंतर मिस्तरी यांच्या घरासमोरील वीजपोलवरुन तिघांघरांमध्ये वीजप्रवाह उतरला असल्याचे लक्षात आले. नागरिकांनी तत्काळ महावितरणच्या कर्मचार्‍यांना माहिती दिली. कर्मचार्‍यांनी वीजपुरवठा खंडीत केला.

बालकाच्या मृत्यूची सलग तिसरी घटना
शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात दुपारी तीन वाजता घराबाहेर खेळत असताना वीजपोलचा स्पर्श होवून विजेच्या धक्क्याने गुरु संतोष माळी वय 3 या बालकाचा मृत्यू झाला होता. यानंतर दुसर्‍याच दिवशी गुरुवारी मेहरुण परिसरात घराबाहेर उभ्या असलेल्या जयेश चंद्रशेखर सोनवणे वय 10 या बालकाला अंगणातील वीजपोलचा विजेचा धक्का बसल्याने मृत्यू झाला होता. दोन्ही घटना ताजी असताना शुक्रवारी 6 वर्षीय आरवचा मृत्यू झाला. तिन्ही घटनांमध्ये वीजखांबामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. महावितरण कंपनीने वीजपोलची तपासणी करावी व अनुचित घटना टाळावी असा सूर नागरिकांमधून व्यक्त होत आहे.