पुणे : जगभरातील वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण बुधवारी पहावयास मिळाले. आशिया खंडात 35 वर्षानंतर हा दुर्मीळ योग आला. ब्लू-ब्लड आणि सुपर मून भारतात भोपाळ, चेन्नई, जयपूर, कोलकाता, भुवनेश्वरसह अनेक ठिकाणी पाहाता आले. पुणेकरांनीही या चंद्रग्रहणाची डोळ्याची पारणे फेडणारी दृष्ये पाहिली.
पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असलेला हा सुपर मून दररोजच्यापेक्षा तब्बल 14 टक्के अधिक मोठा दिसला. तसेच, 30 टक्के अधिक चमकदार दिसला. या विलोभनीय घटनेची अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने टिपलेली ही छायाचित्रे. यापूर्वी ब्लड-ब्लू मूनची दृष्ये 1982 मध्ये दिसली होती. ते यानंतर 31 जानेवारी 2037 मध्ये दिसतील, असेही नासाच्यावतीने सांगण्यात आले.