खडका गावानंतर आता वरणगावातही कोरोनाची धडक

0

भुसावळ : गेल्या काही दिवसांपासून भुसावळात धुमाकूळ घालणार्‍या कोरोनामुळे जनता भयभीत असतानाच सेफ म्हटल्या जाणार्‍या ग्रामीण भागातही कोरोनाने धडक दिल्याने ग्रामीण भागातील जनतेतही भीती पसरली आहे. दोन दिवसांपूर्वी खडका गावात कोरोनाचा रुग्ण आढळून आला असतानाच मंगळवारी वरणगावात कोरोनाने धडक दिल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. वरणगाव शहरातील प्रतिभा नगरातील 55 वर्षीय नागरीकाला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पालिका प्रशासनाने तातडीने या परीसरात सॅनिटायजेशनसह परीसर सील करण्याची प्रक्रिया राबवण्यास सुरूवात केली.

बाधीत रुग्णामुळे वरणगावात खळबळ
बाधीत इसमाचा नेमका कुणा-कुणाशी संपर्क आला? याची माहिती आता प्रशासनाकडून घेतली जात असून असून कुटुंबातील सदस्यांना कॉरंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.देवर्षी घोषाल यांनी दिली. पालिकेतर्फे प्रतिभा नगरचा संपूर्ण परीसर सील करण्यात आला आहे. नागरीकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच अति अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडताना मास्क किंवा रुमाल बांधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.