खडका-फेकरी रस्त्याच्या कामाला मंजुरी

0

आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नांना यश

भुसावळ- तालुक्यातील खडका ते फेकरी रस्त्याची अतिशय दैनावस्था झाली होती. नागरिकांच्या तक्रारीनंतर आमदार संजय सावकारे यांनी या रस्त्याची पाहणी केली व राज्य शासनाच्या विशेष दुरुस्ती निधीतून कामास मंजुरी मिळवल्याने दोन्ही गावातील शेतकरी, नागरीक, कर्मचारी व विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. खडका-फेकरी रस्त्याची अतिशय दुरवस्था झाल्याने या रस्त्यावरून येणारे-जाणारे नागरीक त्रस्त झाले होते.

आमदारांच्या पाठपुराव्याला यश
या रस्त्यावरून खडका-किन्ही येथील नोकरदार दीपनगर येथे मोठ्या प्रमाणावर जातात तर फेकरी परीसरातील नोकरदार खडका एमआयडीसीमध्ये रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर येतात. रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे नोकरदारांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. त्यामुळे परीसरातील शेतकरी, नागरीक व नोकरदार यांनी आमदार संजय सावकारे यांची भेट घेवून रस्त्याची तक्रार केली होती. नागरीकांच्या तक्रारीनंतर आमदार सावकारे यांनी रस्त्याची पाहणी केली व राज्य शासनाच्या विशेष दुरुस्ती निधीतून रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव पाठवला. या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे त्यामुळे शेतकरी, नागरीक व नोकरदारांमधून समाधान व्यक्त होत आहे.