खडका सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे रईसखान लोधी

0

भुसावळ । तालुक्यातील खडका ग्रामपंचायत सरपंच प्रिती पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे तालुकाध्यक्ष व खडका उपसरपंच रईस खान तुराब खान लोधी यांची निवड झाली. प्रिती पाटील या पंचायत समिती निवडणुकीत भाजपाकडून निवडून आल्याने त्यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. प्रिती पाटील व रईस खान यांच्या पत्नी शहनाजबानो लोधी या एकमेकांविरुध्द पंचायत समितीला रिंगणात होत्या. मात्र लोधी यांचा अल्प मतांनी पराभव झाला असला तरी सरपंचपदी रईस खान यांची निवड झाल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. खडका ग्रामपंचायत स्थापनेपासून प्रथमच मुस्लिम समाजाला संधी मिळाली आहे.