खडकी बुद्रूक येथे अल्पवयीन तरुणीचा विनयभंग

0

तरूणीचा आत्महत्येचा प्रयत्न; तरूणाविरोधात गुन्हा दाखल
चाळीसगाव- तालुक्यातील खडकी बुद्रुक येथील 14 वर्षीय अल्पवयीन तरुणीचा विनयभंग केल्याची घटना 20 सप्टेंबर दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली असून घाबरुन तरुणीने फिनाईल पिवून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिची प्रकृती स्थिर असून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला तरुणाविरोधात विनयभंगासह अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अ‍ॅसिड फेकण्याची धमकी
खडकी बुद्रूक येथील 14 वर्षीय अल्पवयीन तरुणी 20 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास रेल्वे लाईनकडे शौचास जावून परत येत असतांना गावातील तरुण अभिमन्यू सुनिल चव्हाण (केदार) याने तरुणीस अडवून ‘मी तुझ्यावर प्रेम करतो तू पण माझ्यावर प्रेम कर नाहीतर तुझ्यावर अ‍ॅसीड फेकून देईल’, अशी धमकी देऊन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर तरुणीने घाबरुन फिनाईल पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला लागलीच चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती चांगली असून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अल्पवयीन तरुणीच्या फिर्यादीवरुन अभिमन्यू सुनिल चव्हाण याच्याविरोधात भादवी कलम 354 (अ), (ड), 341, 506, बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासुन संरक्षण अधिनियम 2012 चे कायदा कलम 8 व अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास डी वाय एस पी नजीर शेख करीत आहेत.