खडकी येथील तरुणाचा उष्माघाताने बळी

0

जळगाव । सुटीच्या दिवस असल्याने खडकीतील नातेवाईकांना भेटून घरी परतत असतांना 25 वर्षीय तरूणास भर उन्हात चक्कर येवून पडल्याने तातडीने जिल्हा रूग्णलयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहीतीनुसार, लक्ष्मण छगन बारेला (वय-25) रा. खडकी ता.भुसावळ हे रोजंदारी करत होते. गुरूवारी 3 मे रोजी कामाला सुट्टी असल्याने काही कामानिमित्त ते नातेवाईकांच्या घरी गेले. सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास घरी परतत असतांना रस्त्याने जात असतांना अचानक चक्कर आले. त्यानंतर त्यांना अत्यवस्थ जाणवू लागले. नातेवाईकांनी तातडीने जवळच्या खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. येथील डॉक्टरांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. आज सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.