माजी सरपंच प्रा. राखी पाटील यांच्या संकल्पनेतून दर वर्षी उपक्रम
सहा मातांचा कन्यांसोबत साडी, चोळी देऊन सत्कार
एरंडोल – तालुक्यातील खडकेसिम येथे नुकताच प्रथम कन्या जन्माचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. खडकेसिम या गावी दरवर्षी प्रथम कन्या जन्माचे स्वागत करण्यात येते. माजी सरपंच प्रा.राखी पाटील यांच्या प्रेरणेतुन हा उपक्रम घेतला जातो. यंदा यावेळी प्रथम कन्या असलल्या सहा मातांचा त्यांच्या कन्यांसोबत साडी व चोळी देऊन सत्कार करण्यात आला.
2010 पासूनचा उपक्रम
यावर्षीही खडकेसिम गावातील माध्यमिक विद्यालयात प्रथम कन्या जन्माचे स्वागत करण्यात आले. विद्यालयाचे अध्यक्ष जगदीश पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.यावेळी प्रथम कन्या असलल्या सहा मातांचा त्यांच्या कन्यांसोबत साडी व चोळी देऊन माजी सरपंच प्रा.राखी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रा.राखी पाटील यांनी या उपक्रमास सन 2010 पासुन सुरुवात केलेली आहे. संपुर्ण महाराष्ट्रात फक्त खडकेसिम या गावी त्यांच्या संकल्पनेतुन गावातील घरांच्या उतार्यावर घरातील पत्नीचे नाव लावले होते व या उपक्रमासाठी त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक झाले आहे.
विद्यार्थ्यांचा गौरव
यावेळी माध्यमिक शाळेतील 10 वी त प्रथम,द्वितीय व तृतिय आलेल्या विद्यर्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष जगदीश पाटील यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.माध्यमिक विद्यालयात 188 मुलं व 189 मुली शिक्षण घेत असुन ’बेटी बचाव,बेटी पढाओ’ हे मिशन आम्ही ख-या अर्थाने साकारत असल्याचे यावेळी संस्थाध्यक्ष जगदीश पाटील यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रम यशस्वीतेसाठी माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचाल डी.बी.पाटील आभार मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांनी मानले. कार्यक्रमास घनःशाम पाटील, मोहनसिंग पाटील, हरचंद वंजारी,चंद्रकांत पाटील, गोरख पाटील, हरी जोगी, हिरा वंजारी, राजु वंजारी, बारकू पाटील यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.