भुसावळ : बुलेट स्लीप होवून झालेल्या अपघातात खडका येथील 48 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. शोभा जयदेव लोधवाल (48) असे मृत महिलेचे नाव आहे. मृत लोधवाल या मुलगा हरी जयदेव लोधवाल (27) सह डांभुर्णी, ता.पाचोरा येथे लेकीला भेटण्यासाठी गेल्या होत्या व परतीच्या प्रवासात किन्ही रोडवर खडका गावाजवळच बुलेट स्लिप होऊन झालेल्या अपघातात शोभा लोधवाल कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा हरिष लोधवाल हा गंभीर जखमी झाला आहे. त्यास उपचारार्थ डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय हॉस्पीटलमध्ये हलविण्यात आले आहे. मृत महिलेच्या पश्चात पती, तीन मुली, दोन मुले असा परीवार आहे.