खडतर प्रयत्नातून नयना झोपे यांना पीएच.डी.

0

जळगाव । खडतर प्रयत्नातून डॉक्टरेट मिळवलेल्या प्रा.अ‍ॅड. नयना झोपे-महाजन यांना नुकतीच उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातर्फे पीएच.डी. डॉक्टरेट प्रदान करण्यात आली त्यांचा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत असलेल्या डॉ.नयना झोपे यांनी एक महिलेने ठरविले तर काहीही करू शकते याचा प्रत्यय आपल्या खडतर प्रयत्नातून दाखवून देत डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. अ‍ॅब्युस ऑफ पब्लीक इंटरेस्ट लिटीगेशन इन इंडीया ए क्रिटीकल स्टडी या विषयावर शोधप्रंबध डॉ मिर्झा बेग इलियास रहीम बेग यांचे मार्गदर्शनाखाली पुर्ण केला.

डॉ. नयना झोपे ह्या महाजन झेराक्सचे नितीन महाजन यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या यशाबददल माजी खा. डॉ उल्हास पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. काशिबाई उखाजी कोल्हे विद्यालयातून दहावी तसेच डॉ.वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लीकेशन येथून प्रथम श्रेणीत उर्तीण झालेल्या यानंतर मणियार महाविद्यालयातून एलएलबी व एलएलएम पदविका प्राप्त केली. एकत्र कुटुंबात राहणार्‍या आपले पती व दोन मुलांचा सांभाळ करत विधी शाखेतील नेट परिक्षा देखिल ते उर्तीण झाल्यात. यानंतर डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयात प्राध्यापक पदावर कार्यरत राहून त्यांनी संशोधन कार्यास 2011 पासून सुरूवात करत 2018 साली डॉक्टरेट पुर्ण केली. या संशोधन कार्यात पती नितीन महाजन, डॉ.जयवंत शिंपी अशोक महाजन, ललीत महाजन, अ‍ॅड.तनुजा महाजन, डॉ तुळशीराम खडके मोलाचे सहकार्य त्यांना लाभले.