भुसावळ : खडवली आणि आटगाव दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील आरएच गर्डर काढण्यासाठी रात्र कालीन ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक मंगळवारी रात्री घेण्यात आल्याने अप-डाऊन मार्गावरील सहा गाड्या विलंबाने धावणार आहेत. मध्य रेल्वे मुंबई विभागातर्फे रोड क्रेन वापरुन हा ब्लॉक घेण्यात आला आहे शिवाय या ब्लॉकमुळे काही गाड्यांच्या मार्गात परीवर्तन करण्यात आला आहे.
मंगळवारी रात्री ते बुधवारी पहाटेपर्यत ब्लॉक
लेव्हल क्रॉसिंग क्रमांक 61 (खडवली व वसिंद दरम्यान) आणि क्रमांक 68 (आसनगाव व आटगाव दरम्यान) येथे आरएच गर्डरच्या उभारण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ब्लॉक घेतला असून तो मंगळवारी रात्री 12.50 ते बुधवारी सकाळी 4.50 पर्यंत (चार तास) असणार आहे. टिटवाला ते आटगाव दरम्यान अप-डाऊन मार्गावर ब्लॉकचे नियोजन केले आहे. ब्लॉकमुळे 02106 गोंदिया-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी 18 मे रोजी दोन तास विलंबाने सुटली तर दुपारी 2.40 वाजता सुटणारी ही गाडी दुपारी 4.40 वाजता सुटली.
मुंबईकडे येणार्या मेल जळगावकडे वळवण्यात येणार
02104 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस स्पेशल (17 मे रोजी सुटलेली तसेच 02810 हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष 17 मे रोजी सुटलेली) या मुंबईकडे येणार्या गाड्या जळगाव-सुरत मार्गे वळविण्यात आल्या आहेत तर कल्याण परीसरातील प्रवाशांसाठी भिवंडी रोड स्थानकावर थांबा देण्यात येईल.
सहा गाड्या धावणार विलंबाने
बुधवार, 19 रोजी मुंबईकडे येणार्या अप मेल/एक्स्प्रेस विविध सेक्शनमध्ये थांबवल्या जातील शिवाय दोन ते तीन तास विलंबाने धावतील. त्यात 02102 हावडा-लोकमान्य टिळक टर्मिनस स्पेशल, 01074 प्रतापगड लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष, 05547 रक्सौल लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष सेक्शनमध्ये थांबवण्यात येईल तर डाऊन मार्गावर 18 व 19 म ेरोजी लोकमान्य टिळक टर्मिनस/छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी 02141 लोकमान्य टिळक टर्मिनस पाटलिपुत्र विशेष, 02193 मुंबई वाराणसी विशेष गाडी तसेच 02538 लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपूर विशेष गाडी एक्सप्रेस सेक्शनमध्ये थांबवली जाईल.