नवी दिल्ली: भाजप नेते एकनाथराव खडसे यांचे पुनर्वसन केले जाईल असे सातत्याने भाजपकडून सांगण्यात येत होते. विधानसभा, राज्यसभा त्यानंतर विधान परिषदेतही त्यांना संधी देण्यात आली नाही. त्यांनतर त्यांनी राष्ट्रीय राजकारणात स्थान देण्यात येईल अशी चर्चा होती. मात्र त्यांना पुन्हा डावलण्यात आले आहे. आज शनिवारी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा करण्यात आली, त्यात माजी मंत्री पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना स्थान देण्यात आले आहे परंतु खडसे यांना पुन्हा डच्चू देण्यात आला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी यासंदर्भातली घोषणा केली.
भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि माजी मंत्री विनोद तावडे या दोघांचीही वर्णी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान देण्यात आले आहे. महाराष्ट्रातून राष्ट्रीय मंत्री पद पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना देण्यात आले. तसेच विजया रहाटकर आणि सुनील देवधर यांना राष्ट्रीय सचिव ही जबाबदारी देण्यात आली आहे. अल्पसंख्याक मोर्चाच्या अध्यक्षपदी नागपूरचे जमाल सिद्दीकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda ने भाजपा केंद्रीय पदाधिकारियों के नामों की घोषणा की। pic.twitter.com/oLGRoSmbPa
— BJP (@BJP4India) September 26, 2020
विधानसभा निवडणुकीत एकनाथराव खडसे, विनोद तावडे यांना उमेदवारी देण्यात आली नाही. पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. तावडे आणि पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करण्याचा भाजपने प्रयत्न केला मात्र खडसे यांना न्याय दिला नाही. खडसे हे गेल्या काही दिवसांपासून भाजपात नाराज आहेत, त्यांनी त्यांची नाराजी जाहीर बोलून देखील दाखविली आहे. फडणवीस यांच्यावर त्यांनी निशाणा साधला होता. खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा होती, मात्र त्यांनी त्यास नकार दिला आहे.