वरणगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना विधान परीषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर करताच वरणगावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांनी बसस्थानक परीसरात फटाके फोडून तसेच पेढे वाटुन जल्लोष केला.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र विश्वनाथ चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, युवक जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, माजी नगराध्यक्षा अरुणा इंगळे, महिला जिल्हा उपाध्यक्षा प्रतिभा तावडे, महिला शहराध्यक्षा रंजना पाटील, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष मनोज कोलते, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष पप्पू जकातदार, माजी नगरसेवक सुधाकर जावळे, साजीद कुरेशी, गणेश चौधरी, विष्णु खोले, रोहिणी जावळे, प्रतिभा चौधरी, प्रकाश नारखेडे, अनिल चौधरी, राजेश इंगळे, इफ्तेखार मिर्जा, महेश सोनवणे, नरेंद्र इंगळे, पिंटू धोबी, युवक शहराध्यक्ष सोहेल कुरेशी, लखन चौधरी, उल्हास पाटील, सचिन पाटील, विनायक शिवरामे, संतोष चौधरी, रहेमान शाह यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.