खडसे आणि इनामदार यांची नार्को चाचणी करा 

0
अंजली दमानिया यांचे मुख्यमंत्र्याना पत्र
मुंबई  : माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि अपच्या नेत्या अंजली दमानिया यांच्यातील वाद आता टोकाला गेला असून अंजली दमानिया यांनी बुधवारी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इमानदार यांच्या नार्को चाचण्या करण्याची मागणी केली आहे.
मुंबईत पत्रकार परिषदेत दमानिया यानी इनामदार यांनी त्यांच्या विरोधात केलेल्या आरोपांचा समाचार घेतला आणि नाशिक मध्ये खडसे यांची लाचलुचपत विभागाने चौकशी केल्यानंतर इनामदार यानी आपल्या विरोधात आरोप केल्याचे सांगून त्यांचा बोलविता धनी कोण आहे? असा सवाल केला आहे. खडसे यांनी आपण त्यांच्या विरोधात आरोप केल्यानतर धमकावण्याचे आणि खोट्या खटल्यात अडकविन्याचे प्रयत्न केल्याचे तसेच व्दयर्थी विधाने करून महिला म्हणून बदनाम करण्याचे प्रयत्न केल्याचेही दमानिया यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.