खड्डे चुकवताना नियंत्रण सुटलेले ट्रॅक्टर पाटचारीत कोसळले : २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

A young man died after a tractor overturned in Nagduli Shiwar एरंडोल : नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पाटचारीत कोसळल्यानंतर त्या खाली दबले जावून शिरपूर तालुक्यातील तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास घडला. योगेश ज्ञानेश्वर सैदाणे (२०, रा.अंबे, ता. शिरपूर) असे मयत तरुणाचे नाव आहे. हा अपघात एरंडोल तालुक्यातील नागदुली शिवारात मक्याचा चारा आणण्यासाठी जात असताना घडला.

नियंत्रण सुटल्याने चारीत कोसळले ट्रॅक्टर
नागदूली येथे मामांकडे योगेश हा तरुण वास्तव्यास होता व ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता रवींद्र अभिमान कोळी, योगेश ज्ञानेश्वर सैंदाणे, उदेस गोविंदा कोळी, खूशाल राजू, रवींद्र अभिमान कोळी यांच्यासोबत योगेश सैंदाणे हा नागदूली शिवारातील शेतातील चारा भरण्यासाठी ट्रॅक्टर क्रमांक (एम.एच१९ डीव्ही २६७१) ने असताना चालक रवींद्र अभिमान कोळी यांचे नियंत्रण सुटल्याने सुकेश्वर मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यावर पाटाच्या चारीत ट्रॅक्टर पलटी झाले.

दबला जावून तरुणाचा मृत्यू
या दुर्दैवी घटनेचे वृत्त कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. योगेश सैंदाणे हा ट्रॅक्टरच्या मडगार्डवर बसल्याने ्रॅक्टरचे धूड खाली दाबल्या गेल्याने जागीच गतप्राण झाला. ग्रामस्थांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले व खाजगी गाडीने एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास पाटील यांनी तपासणीअंती मयत घोषीत केले. ट्रॅक्टर चालक रवींद्र कोळी व ट्रॉली धील उदेश कोळी, खुशाल माळी यांना किरकोळ मार लागल्या असल्याने त्यांना सुद्धा उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी दीपक शालिक कोळी यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला .