रस्ता खोदाईचा ग्राहकांचा फटका
पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या ‘क’ प्रभागांतर्गत महात्मा फुले पुतळ्यासमोर ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. या कामाच्या रस्ते खोदाईमुळे बीएसएनएलची केबल तुटल्याने मंगळवारी दुपारी बारापासून सायंकाळी सहापर्यंत खराळवाडी परिसरातील टेलिफोन व इंटरनेट बंद होते. याबाबत बीएसएनएलला कोणतीही पुर्वसुचना देण्यात आली नव्हती. खराळवाडीतील भारत संचार निगम कार्यालयास माहिती मिळाल्याने अधिकार्यांनी घटनास्थळी येवून त्वरीत दुरूस्तीचे काम हाती घेतले.
महापालिकेने रस्ते खोदाई करण्यापुर्वी बीएसएनएल किंवा अन्य कोणती केबल लाईन गेली आहे का? याची माहिती घेणे गरजेचे आहे. परंतू, पालिकेचे अधिकारी अशी कधीच माहिती घेत नाहीत अथवा संबंधितांना पूर्वकल्पनाही देत नाहीत. त्यामुळे पालिकेच्या ड्रेनेज खोदाईमुळे बीएसएनएलचे केबल तुटून मोठे नुकसान झाले. तसेच बीएसएनएल ग्राहकांनाही त्रास झाला. यापुढे तरी रस्ते खोदाई करताना महापालिकेच्या अधिकार्यांनी काळजी घ्यावी.
–आर. आर. कातरकी, मंडल अभियंता
खराळवाडी कार्यालय, बीएसएनएल