धानोरा । शेतकर्यांनी खरिप पेरणीपुर्व मशागतीचा कामांना सुरूवात केली आहे. शेतातील काडीकचरा वेचण्यांसह नांगरणीचा कामास वेग आला असून चोपडा तालुक्यात जवळपास 70 टक्के नांगरणीचे कामे पुर्ण झाले आहेत. ट्रक्टर नांगरणी करण्यासाठी एकरी 1000 रुपये खर्च येत आहे. रब्बी पिक घेतल्यानंतर उन्हाळ्यामध्ये जमीन नांगरून तापु दिली जाते. नांगरटीच्या मशागतीमुळे जमीनीचा आतील बुरशी बर्याच प्रमाणात नष्ट होते. शिवाय सुप्त किंवा कोष अवस्थेतील किड नष्ट होते. कडक उन्हामुळे जमीनीतील नत्राचे प्रमाण वाढत जाते. आता मान्सुन येण्यापूर्वी सर्व मशागतीची कामे उरकन्यासाठी शेतकरर्यांची लगबग सुरू आहे.